English येत नाही म्हणून आपण मागे पडलो अस वाटतंय ? परदेशी भाषा येत नाही? मग कोण शिकवणार आपल्याला...? तेच जर online शिकता आलं तर...? कस ते सांगतो...
Break your pens Band be armed!.....लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या!
या जाज्वल्य वाक्याचं शाब्दश: भाषांतर असूनही, काहीच अर्थबोध होणार नाही. कदाचित काहीच कळणार नाही. कारण मुद्दा हा की केवळ शब्दश; भाषांतर करता येणं हे पुरैसं नाहीच; त्याचबरोबर ते सॉफ्ट स्किल्समध्येही पुरेसं नाही. ज्याला संदर्भ किंवा कॉँटेक्स्ट म्हणतात ते माहिती असणं आणि त्यानुरूप विषय मांडताना अर्थवाही भाषांतर अत्यंत महत्त्वाचं होय, सॉफ्ट स्कील्समध्ये भाषाप्रभुत्व हा भाग येतोच; परंतु परकीय भाषा पारंगत असणं हा सुद्धा अत्यंत आकर्षक भाग आहे.
बरं आता काळ बदलला त्यामुळे अमुक भाषा तमुक ठिकाणीच शिकायची असं काही उरलेलं नाही. अन्य अनेक मार्गानी या भाषांवर प्रभुत्व मिळवणंही शक्य आहे. बर्याच खासगी संस्था व वैयक्तिक पातळीवरसुद्धा या दोन्ही भाषा शिकता येतील. परंतु तेही खर्चीक असू शकतं याची मला कल्पना आहे. त्यामुळे तुम्ही ते कमी खर्चात कस करू शकाल त्याच्या काही कल्पना मी तुमच्यासमोर मांडतो.
- 1. पहिलं म्हणजे त्या त्या भाषेच्या सीडीचा सेट विकत घेऊन इतर मित्र-मेत्रिणींबरोबर शेअर करून ते शिकणं,
- 2. यापेक्षा स्वस्त - खरं तर विनामूल्य मार्ग म्हणजे इंटरनेट, त्यात पहिला म्हणजे edx.org किंवा coursera.org या वेबसाइटवरून त्या त्या भाषेचा फॉर्मल कोर्स करुन सर्टिफिकेट मिळवणं.
- 3. अजून एक वेबसाइट म्हणजे openculture.com या वेबसाइटवर तुम्ही ४८ भाषा शिकू शकता आणि त्याही मोफत.
- 4. मला वाटतं अजून एक अत्यंत पॉवरफूल माध्यम आहे. Apps . यातील Duolingo नावाचं अॅप अत्यंत उपयुक्त आहे. यावर तुम्ही २१ पेक्षा अधिक भाषा विनामूल्य आणि सहज शिकू शकाल!
- भाषांवरचं प्रभुत्व दाखविण्यासाठी सर्टिफिकेट असलं तर छानच. नसलं तरीही तुम्ही रिझ्युममध्ये लिहिलंत किंवा मुलाखतीत सांगू शकलात की मी परकीय भाषा या आवडीमुळे व स्वतंत्ररीत्या शिकलो तर कंपन्यांना ते खचितच आवडेल.
- जाता जाता मला तुम्हाला हे नमूद करायचं आहे की भाषेचा फायदा होईलच, परंतु त्याचबरोबर टेक्निकल ट्रान्सलेशनमध्ये, दुभाषी म्हणून सुद्धा रीतसर नोकरीत होऊ शकेल.
- संभाषण कौशल्यातही परकीय भाषा नक्की येतातच; पण एक कल्पना म्हणून सांगून ठेवतो की मातृभाषा सोडून इतर भारतीय भाषांपैकी एक येणं सुद्धा चांगलंच! फक्त परकीय भाषांवर प्रभुत्व असणं हाच आपला उद्देश नसून संभाषण सहज होणं हे आपलं उद्दिष्ट आहे! तेव्हा सहज शिका, मोफत आणि सहजही!

2 Comments
It's very helpful..
ReplyDeleteVery nice 👌👌
ReplyDelete