सुट्टी करता येतील अशा 10 गोष्टी....!😎


भली मोठी सुट्टी असूनही, हातात पुरेसा वेळ असूनही, आपण काहीच केलं नाही अस वाटतंय..?
तर मग काय करता येईल ह्याची ही एक सोप्पी यादी…! 



1. निअर टू फार

           अनेकांना वाटतं की आपण प्रवास करायला हवेत. म्हणजे अमेरिका, थायलंड, इंग्लंड अशा देशात आपण फिरलो असतो; पण आपल्याकडे पैसे नाहीत, साधं मुंबई-दिल्लीला जाता येत नाही. परदेशात काय जाणार?
            मात्र असा विचार करु नका. जगभर एक महत्त्वाचे सूत्र मानलं जातं. ते म्हणजे निअर टू फार. म्हणजे आधी जी गोष्ट आपल्या जवळची आहे ती पाहा. अगदी गावातली, पंचक्रोशीतली, तालुक्यातली, जिल्ह्यातली गोष्ट समजून घ्या. आपल्या जिल्ह्याचा तरी किमान इतिहास-भूगोल, प्रश्न, खानपान हे सारं समजून घ्या. अगदी जवळ आहे तिथून सुरुवात करा आणि मग जग पाहा. त्यासाठी पैसे नाही फक्त नजर लागते.

2. गो लोकल

              पुन्हा सूत्र तेच. लोकल ग्लोबल असण्याचा हा जमाना आहे. मोअर द पर्सनल, मोअर द लोकल इज़ मोअर द ग्लोबल असं नवीन समीकरण आहे. त्यामुळे लोकल अर्थात स्थानिक जे जे महत्त्वाचं ते ते सारं समजून घ्या. गावचं मंदिर ते गावातली नदी, तिचं प्रदूषण, ते पीकपाणी इथून माहिती काढत गेलं तर हाती लागेल त्याची लिंक कुठंतरी ग्लोबल काळात लागेल

3. प्रवास .. कमी खर्चात!

               म्हणजे काय अभ्यासच करायचा का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर अभ्यास नव्हे, प्रवास करा. आणि तोही जवळच्या जवळ, एसटीनं, सार्वजनिक वाहनानं, पायी करा. फिरा. किमान आपला जिल्हा, आपलं राज्य तरी या उन्हाळ्यात समजून घ्या.

4. पायी फिरा..

                अगदी एसटीचेही पैसे नाहीत तुमच्याकडे असं मानलं तर पायी फिरा. घरुन डबा घेऊन जा, एक दहा किलोमीटरचा परीघ फिरून या. नोंदी काढा की कोण कोण भेटलं, काय बोललं, काय दिसलं. इतकं चांगलं ग्राउण्ड वर्क करायची संधी एरव्ही कधीही मिळणार नाही.

5. अनुभव कमवा

                आपल्याला जे काम आबड़तं किवा ज्यात करिअर करायचं आहे असं वाटतं, त्याचा आपल्याला अनुभव काय ? तर काहीच नाही. तो मिळण्याची शक्यताही नसतेच. मग आपण आपल्या विषयात काम करणार्या तज्ज्ञांना, अनुभवी लोकांना भेटावं. काम समजून घ्यावं. संधी मिळालीच तर पैसे न मागता झोकून देऊन काम करावं. काम शिकावं. हे काही दिवस जरी केलं तरी आपल्या स्किलची कमाई मोठी असेल.

6. कधीच केलं नाही ते..

                  असं काम जे आपण आजवर कधीच केलेलं नाही, करण्याची शक्यता नाही ते करुन पाहा. काहीही. अगदी गवंडी काम, सुतार काम शिकता येतं का? रोज घरात कपड़े धुतले तर? रांगोळी काढायला शिकली तर? स्वयंपाक शिकला तर? वाळवणं करायला मदत केली तर? असं बरंच काही आहे, जे करायला पैसे नाही तर फक्त उत्साह लागतो. आळस सोडला तर तोही चटकन संचारतो.


7. सिनेमे पाहा..

          पायरेटेड नव्हे तर चांगल्या सिनेमाच्या सीडी मिळवा, यू-ट्यूबवर अनेक फिल्म्स, शॉर्टफिल्म उपलब्ध आहेत, उत्तम गाणी आहेत, उत्तम भाषणं आहेत. ते भरपूर पाहा. हातातल्या फोनचा, दीड जीबीचा उत्तम उपयोग करा.

8. पुस्तकं ऐका.

            पुस्तकं भरपूर वाचाच, पण वाचनाचा कंटाळाच असेल तर आता पुस्तकं ऐकण्याचीही सोय उपलब्ध आहे. ती पुस्तकं ऐका.


9. गाव आणि ग्रामपंचायत,

            आपल्याला आपलं गाव, ग्रामपंचायतीचे काम, ग्रामसभा, तिचे हक्क हे तरी कुठ माहिती असतं. ते समजून घ्या. गावात आपण दोस्त मिळून काय छोटं काम करू शकतो, याचा अंदाज घ्या. आपल्याला आपलं गावही समजून घेता येणं गरजेचं आहे.

10. व्यायाम

            यादीत शेवटीच येतो हा विषय नेहमी. आणि कुणी विचारेलही की, उन्हाळ्यात कुणी व्यायाम करतो का? मात्र सुटी आहे नियमित चालणं, वेट ट्रेनिंग, पळणं हे तर सहज करता येईल. स्वत:कडे लक्ष देणं हे काही कमी महत्त्वाचं नाही.





Post a Comment

2 Comments