Burn out.. ☹️😒😞😖😤


दिवाळी झाली, मस्त सेलिब्रेशन झालं, खूप मजा केली, खूप काम केलं तरीही रिलॅक्स वाटण्याऐवजी थकवा आला आणि मरगळल्यासारखंच झालं, असं होतं तुमचं ? ते कशानं ? आणि त्यावर उपाय काय ?





दिवाळीच्या फटाक्यासारखी एकदम खूप एनर्जी लावली आणि ती फुस्सं होऊन आपलाच फुसका फटाका झाला, असं का होतं अनेकदा ?

दिवाळी संपली..
                        येणार येणार म्हणत आली आणि दिवाळी गेली ही.. कधीतरी या काळात तुमच्या मनात आलं का, दिवाळी नको, सेलिब्रेशन नको, खरेदी नको, फक्त झोप काढू नेहमीपेक्षा जास्त दगदग झाली या दिवाळीत. कामाची यादी संपलीच नाही. खूप साऱ्या डेडलाइन. अभ्यास. क्लासेस. परीक्षांचा ताण, घरकामात मदत, पाहुणे, भेटीगाठी, गप्पाटप्पांत गेलेला वेळ हे सारं म्हणजे मोठ कामच होऊन बसलं आणि आपण फार दमलों या साऱ्यात...
                        खरं तर रिलॅक्स व्हायचं होतं, खूप आराम करायचा होता, सिनेमे पहायचे होते, गप्पा मारायच्या होत्या भावंडांशी, मित्रमैत्रिणींशी. पण आपली कामच संपली नाही. सगळीकडे नुस्ते धावतपळत पोहोचलो आणि सगळे निभावलं कसंबसं, यासार्या सेलिब्रेशनपेक्षा रुटीनच कमी दगदगीचं असतं, तेच बरं..
                        हे असं वाटलं असेल तर तुम्ही काही एकटेच नाही. या भावनेतून मोठ्या सणानंतर किंवा एखाद्या मोठ्या स्पर्धेनंतर, परीक्षेनंतर, घरातल्या लग्नानंतर किंवा अगदी दिवाळीच्या सेलिब्रेशननंतरही अनेकजण जातात. थकवा येतो, मरगळ आल्यासारखं वाटतं, तरतरी वाटत नाही आणि आरामच करावासा वाटतो...
त्याला कारण म्हणता येईल बर्नआउट !

                        म्हणजे दिवाळीतलं भुईनळ किंवा भुईचक्र होऊन जातं आपलं. इतके उत्साहात असतो, इतके जोशात की आपल्यात आहे नाही ती सगळी एनर्जी एका ठिकाणी, एकाचवेळी लावतो आणि मग एकदम उसळी मारुन गरगर फिरतो आणि मग एकदम विझल्यासारखे फुस्स होऊन जातो... आणि मग एकदम गपगार होतो.. वाटतं, हे काय झालं..

                        तर या अवस्थेलाच बर्नआउट म्हणता येईल..

                        तर हा असा शीण घालवायचा असेल आणि नव्या उमेदीनं आणि एनर्जीनं दिवाळीनंतर पुन्हा कामाला सुरुवात करायची असेल तर काय करायला हवं याचाही विचार करायलाच हवा.
            तो केला नाही तर हे बर्नआउट फिलिंग मरगळ होऊन आपल्या कामावर आणि रूटीनवर पसरतं. त्यातून मग कळतच नाही की, नेमकं सारं उत्तम असून, आनंदी असूनही आपल्याला असं मरगळल्यासारखं का वाटतं आहे.
                  तर दिवाळीनंतर आता छान थंडी सुरु होईल. ती मरगळ आणि शरीरासह मनाला आलेलं जडत्व झटकून टाकण्यासाठी हे साधेसोपे उपाय !


बर्नआउट म्हणजे काय ?

                        खरं तर ही एक मानसशास्त्रीय फ्रेज आहे. ज्यावर जगभर अभ्यास झालेला आहे. मात्र मानसिक आजार असं म्हणून याकडे पाहता काही गोष्टी तपासून पाहिल्या तर सतत काम करण्याचा, सतत एखाद्या गोष्टीचा ध्यास म्हणून तयारी करण्याचा, शारीरिक कष्टांचा परिणाम म्हणूनही बर्नआउट झाल्यासारखं वाटू शकतं. अनेक अॅथलिट आणि खेळाडूंना अशी समस्या मोठ्या स्पर्धेनंतर येते, कारण ते दीर्घकाळ एका ध्येयासाठी प्रयत्न करत असतात. आणि ते लक्ष्य साध्य झालं किंवा नाही झालं तरी त्यांना एकप्रकारचा शीण येतो.
                       अनेकदा काही प्रोफेशनल, विविध प्रोजेक्टवर काम करणारे, अनेक परीक्षा देणारे अशा अनेकांना अशा प्रकारचा बर्नआउट फील येतो.
       त्याची काही लक्षणंही दिसतात.

1.      सतत थकवा. काही करावंसं वाटणं.
2.      उदास वाटणं किंवा स्वत:विषयी/इतरांविषयी नकारात्मक
3.      विचार येणं.
4.      मरगळ वाटणं,
5.      कामात किंवा कशातच लक्ष लागणं.
6.      स्वत:ची काळजी घेगं, देखभाल करणं.
7.      कामच संपण. सतत हातात काम आहे असं वाटणं ..

                     अर्थात ही कारणं फार ढोबळ आहेत. ती अनेकदा सगळ्यांना जाणवतात. प्रदीर्घ काळ हे जाणवलं तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्वायला हवा.

        
 रिफ्रेश होण्यासाठी काय करायचं ?

1.      एकतर आपलं मॉर्निंग रुटीन असलं पाहिजे. कधी ला उठले, कधी ला, कधी दुपारी १२ वाजता असं करू नये. रोज सकाळी उठण्याची आपल्याला सोयीची अशी एक वेळ ठरवावी आणि त्याचवेळी उठावं. रोज. त्यानं आपलं बॉडी क्लॉक सेट व्हायला मदत होतेच; पण पुढे होणारी कामाची धावपळ कमी होते

2.      रोज जमेल तसा म्हणजे 0 मिनिटं का होईना; पण व्यायाम करायलाच हवा. तोही रोज. एकदिवस केला, एकदिवस नाही असं करु नये.

3.      नो स्क्रीन टाइम. सकाळी घाईच्या वेळात मोबाइल पहायचाच नाही किंवा अमुक वाजेपर्यंत मोबाइल पहायचा नाही अशी शिस्त स्वत:ला लावून घ्यावी.

4.      नास्ता. ही फार ढोबळ गोष्ट आहे असं वाटेल; पण नास्ता रोज सकाळी केला तर आपल्या शरीराला एनर्जी मिळते आणि मूढही चांगला राहतो.

5.      दिवसभरात आपण काय काय करणार आहोत याचे एक पॉझिटिव्ह प्लॅनिंग करावं. तेही कागदावर किंवा मोबाइलच्या प्लॅनरवर आणि महत्त्वाच्या कामाची क्रमवार शिस्तीत यादी करावी.

6.      ठरल्यावेळी रात्री झोपावं. हे सारं बोअर वाटलं तरीही त्यामुळे आपल्या मनाला आणि शरीराला येणारा थकवा एका विशिष्ट रुटीनमुळे कमी व्हायला मदत होते.


टू डू लिस्ट !

            बनआउट होण्यात एक सगळ्यात महत्त्वाचा त्रास असतो तो म्हणजे हातातलं कामच संपण्याचा. आपण काम करतोच आहोत; पण ते संपत नाही, अभ्यास संपत नाही, थकवा येतो असं वाटतं. त्यावर एक सोपा उपाय म्हणजे. महत्त्वाची कामं आणि कमी महत्त्वाची कामं यांची एक यादी करायची. एकावेळी एकच काम या गतीने गहत्त्वाची कागं आधी रांपवून टीक मार्क करायची. त्यानं काम होत असल्याचं समाधान मिळतं आणि कामाचा वेग वाढतो.


----- The Reference of this post is Lokmat - E-oxygen. ! 

Post a Comment

0 Comments